नवी दिल्ली : देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार 2016 या वर्षाच्या तुलनेत 2017 या वर्षात देशातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. 2016 साली देशभरात 4,80,652 रस्ते अपघात झाले, त्यात 1,50,785 जणांना प्राण गमवावे लागले. 2017 साली देशात 4,64,910 रस्ते अपघात झाले आणि त्यात 1,47,913 जण दगावले.
महाराष्ट्रात 2016 साली 39878 रस्ते अपघात झाले, त्यात 12935 जणांना प्राण गमवावे लागले तर 2017 साली 35853 रस्ते अपघात झाले आणि त्यात 12264 जण दगावले.
रस्ते वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.