
रत्नागिरी : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या 04 सप्टेंबर 2018 रोजीच्या बैठकीत रिक्षासाठी सुधारित भाडे आकारणी निश्चित करण्यात आली आणि त्यानुसार 07 सप्टेंबर 2018 पासून अंमलबजावणी ठराव पारित झाला. भाडे निश्चीती करताना रिक्षा चालक मालक यांना भाडे मिटरप्रमाण रिक्षा भाडे आकारण्याची तसेच प्रवाशानाही त्याबाबत काही तक्रार असल्यास ई-मेल , पोस्टद्वारे, टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले हाते.
त्यानुसार रिक्षा चालक हे मिटरप्रमाणे रिक्षा भाडेदर आकारणी करत नसल्याबाबत तक्रारी कार्यालयात प्राप्त होत आहेत. तरी रत्नागिरी जिल्हयातील सर्व रिक्षा चालक व मालक यांनी प्रवाशांकडून मिटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारावे. मिटरप्रमाणे रिक्षा भाडे न आकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी मार्फत विशेष रिक्षा तपासणी मोहिम नजिकच्या काळात राबविण्यात येणार आहे. तरी रिक्षा चालकांनी यांची नोंद घ्यावी.
तसेच सर्व नागरिकांनीही रिक्षा प्रवास करताना मिटरप्रमाणे भाडे द्यावे, जादा भाड्याची मागणी करणाऱ्या तसेच भाडे नाकरणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात याकार्यालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 02352-229444 या क्रमांकावर वाहन क्रमांकसह तक्रार नोंदवावी, तसेच पोटस कार्डद्वारेही तक्रार स्विकारण्यात येतील, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले.
















