रत्नागिरी (आरकेजी): अवैध प्रवासी वाहतूक व इतर मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील रिक्षाचालक मालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. दापोलीतून पायी अलेल्या रिक्षाचालकांनी यावेळी उपोषण केले. जिल्ह्यातील रिक्षा मालक चालक आणि माल वाहतूक संघर्ष समितीने त्यांना पाठिंबा दिला. तसेच मंडणगडपासून ते राजापूर पर्यतचे सर्व रिक्षा चालक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
कर भरून रिक्षा व्यवसायिक रिक्षा व्यवसाय करतात. मात्र अवैध प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा चालकांचे कंबरडे मोडलं जातय. त्यामुळे या विरोधात अवैध प्रवासी वाहतुकीच्या कारवाई व्हावी यासाठी रिक्षा चालक एकवटले आहेत. या कारवाईसाठी ११ एप्रिलपासून रिक्षा चालकांनी दापोलीतून पायी प्रवास सुरु केला होता. आज पदयात्रा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. रत्नागिरीतील सर्व अवैध प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करावी. त्याचप्रमाणे चिपळूण तालुक्यातील पिंपळी इथे ब्रेक टेस्टिंग युनिटची उभारणी करावी. तसेच जो पर्यंत तालुक्यांमध्ये ब्रेक टेस्टिंग ट्रक तयार होत नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यात पूर्वीप्रमाणे पासिंग चालू करावे. अन्यथा तालुक्यात होणाऱ्या प्रायव्हेट गाड्या, टू व्हीलर तसेच लायसन्स अशा सर्व प्रकारचे कॅम्प तालुक्यात बंद करावेत. सेवानिवृती पेन्शनधारकांना परमिट दिले जाते ते बंद करावे. नवीन परमिट देताना त्याची असणारी रक्कम कमी करावी. लायसन्स देण्यासाठी शिक्षणाची अट क्षितील करून ७ वी पास करावी. परिवहन खात्यातून चालणारे सर्व व्यवहार हे मराठी भाषेतून करावेत अशा अनेक मागण्या रिक्षा चालक मालक संघटनांनी केल्या आहेत. याबाबतचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.