नागपूर : रायगड जिह्यातील कर्जत तालुक्यात कशीळे व पाथरज येथे आदिवासी महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी हिवाळी अधिवेशनात लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
या संदर्भात सदस्य प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, ॲङ आशिष शेलार, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी, अमित साटम यांनी रायगड जिल्ह्या आदिवासी विकास महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्रश्न विचारला होता त्याला लेखी उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुका आदिवासी उपयोजना क्षेत्रात येतो, या तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी संस्था कशेळे व खांडस यांच्यामार्फत खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 28 नोव्हेंबर, 2017 पासून कर्जत तालुक्यात ही केंद्र सुरु करण्यात आली आहे.