रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोकण बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले. महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.25% लागला आहे.
महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे:
शास्त्र शाखेचा एकूण निकाल ९२.१७ टक्के लागला तर कलाशाखेचा ९५.२८ टक्के व वाणिज्य शाखेचा ९९.७५ टक्के व एमसीव्हीसीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये शास्त्र शाखेतून प्रथम पूर्वा महेश दामले, अथर्व महेश करमरकर (९२.५०), द्वितीय शिवम राजन कीर ( ९२), कल्याणी सुधीर केळकर (९०.८३) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
कलाशाखेतून प्रथम सोनिया आशीष जाधव (९३.६७ ), द्वितीय जान्हवी सचिन जोशी आणि श्रावणी चंद्रशेखर दाते (९१.३३ ), तृतीय दिशा दीपक लांजेकर (९०.८३ ) यांनी क्रमांक पटकावला.
तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम गौरी महेंद्र कुलकर्णी ( ९७.८३), द्वितीय पृथा राजीव ठाकूर आणि आत्मजा योगेश मुळ्ये (९७.६७ ) व तृतीय नुपूर नरेंद्र रानडे (९७.५०) यांनी क्रमांक पटकावले.
एमसीव्हीसी विभागामध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पायल संदीप मातल ( ८८.३३), शुभम संतोष मालप (८७.५० ), विघ्नेश संतोष माने (८५.१७ ) यांनी पटकावला.
र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्री. श्रीपादजी नाईक, उपाध्यक्ष श्री.विजय साखळकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश जी शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य श्री. चिंतामणि दामले आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.