मुंबई : रिलायन्स एंटरटेनमेंट या अनिल धीरुभाई अंबानी ग्रूपच्या (एडीएजी) मनोरंजन क्षेत्रातील व्यवसायाचा भाग असलेल्या रिलायन्स गेम्स या कंपनीने गोफिजिटल या मुंबईस्थित कंपनीसोबत नुकतीच भागीदारी केेेली. तसेच ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये यापदार्पण करत असल्याची घोषणादेखील केली.
आयडीसीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार,एआर आणि व्हीआर क्षेत्रावर जगभरात खर्च होणाऱ्या रकमेचा आकडा २०२१ पर्यंत २१५ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल. २०१७ मध्ये सुमारे ११.४ अब्ज डॉलर्स या क्षेत्रावर खर्च केले जात आहेत.
या भागीदारीचा भाग म्हणून रिलायन्स गेम्स आणि गोफिजिटल एकत्र येऊन मूळ आयपी आणि लायसन्स्ड आयडीवर आधारित ऑगमेंटेड रिअॅल्टी, व्हर्च्युअल रिअॅल्टीवर आधारित अॅप्स, गेम्स आणि अनुभवांची निर्मिती करतील.
रिलायन्स एंटरटेनमेंट–डिजिटलचे सीईओ अमित खांदुजा म्हणाले, “आम्ही आमच्या मोबाइलवापरकर्त्यांना कन्सोलचा अनुभव देतोय आणि एआर आणि व्हीआरच्या माध्यमातून आम्हाला अॅप्स आणि गेम्सच्या क्षमतांमध्ये वाढ करायची आहे. आम्ही सातत्याने नव्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. त्यामुळे, आता आम्ही एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. यातून, येणाऱ्या दिवसांमध्ये डिजिटल कंटेट कसा वापरला जातो, ग्राहक अनुभव आणि त्यांची पद्धती यात मोठे बदल घडून येणार आहेत. खेळणाऱ्याचे व्हर्च्युअल जग अधिक समृद्ध् करण्यासाठी आमची क्रिएटीव्ह टीम सध्या प्लेअर डेटाचा अभ्यास, त्यांच्या खऱ्या जगातील लेव्हल आणि गेम्सचे डिझाइन यांच्यावर काम करत आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंटसोबतच्या भागीदारीबद्दल गोफिजिटलचे संस्थापक आणि सीईओ हितेश जैन म्हणाले, “गेल्या काही वर्षात डिजिटल एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात गेमिंगच्या नव्या संकल्पना प्रस्थापित करणाऱ्या रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या टीमसोबत काम करून मनोरंजनाला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
गोफिजिटल आधीपासूनच ऑगमेंटेड रिअॅलिटी बेस्ड कॅज्युअल गेम्सच्या क्षेत्रात कार्यरत आहे. यात रिलायन्स गेम्सतर्फे लवकरच सादर होणाऱ्या अॅपलच्या एआरकिटचा समावेश आहे.