
संग्रहीत छायाचित्र
मुंबई, 13 ऑगस्ट : कोविड आणि त्यादृष्टीने असलेल्या विलक्षण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. २३.७.२०२० रोजी मध्य रेल्वेने दिलेल्या पत्राद्वारे राज्य सरकारला महाराष्ट्रात कोकणात जाणा-या गणपती विशेष गाड्या (विशेष लांब पल्ल्याच्या मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवण्याविषयी ), या विशेष गाड्या कशा चालवायच्या, त्यांची संख्या आणि तारीख याबाबत त्यांची मते विचारली होती. संचालक, आपत्ती व्यवस्थापन युनिट, महाराष्ट्र यांनी त्यांच्या ७.८.२०२० च्या पत्राद्वारे मध्य रेल्वेच्या पत्राला उत्तर म्हणून गणपती महोत्सवासाठी कोकणात विशेष गाड्या नियोजित केल्या जाऊ शकतात असे कळवले. त्यानुसार मध्य रेल्वेने त्वरित विशेष गाड्यांचे वेळापत्रक तयार केले आणि रेल्वे बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठविले.
कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या आंतरजिल्हा प्रवासाच्या मानदंडांच्या मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) च्या अधीन असलेल्या विशेष गाड्या चालवण्यास तत्काळ ९.८.२०२० रोजी मान्यता दिली आहे.
सोशल डिस्टंसिंग इत्यादी सर्व नियमांच्या अधीन राहून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास रेल्वे तयार आहे, तथापि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री दूरध्वनीवरून विशेष गाड्यांच्या चालविण्याचे वेळापत्रक थांबून ठेवण्यास सांगितले. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असून त्याच्या विषयी लवकरच सल्ला दिला जाईल असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून रेल्वे प्रशासन, बोर्ड आणि झोनल स्तरावरून महाराष्ट्र सरकारच्या अधिका-यांशी सातत्याने संपर्कात आहे आणि पुढे जाण्याची वाट पहात आहेत.
मध्य रेल्वे प्रवाशांना विशेष रेल्वे चालविण्यास तयार असल्याची माहिती देऊ इच्छितो, तथापि, महाराष्ट्र राज्य सरकारकडून अंतिम पुष्टी अद्याप झालेली नाही