रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कवडीमोलदराने या जमिनी लँड माफियांनी विकत घेतल्या असून, या जमिनिंना नंतर लाखो रुपये मोबदला मिळू शकतो. आणि त्यांच्यासाठीच हा रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. गुजरातचे लँड माफिया अब्जोधीश होतील, पण कोकण भकास होईल. त्यामुळे लवकरच या लँड माफियांची यादी नावासहित यादी जाहीर करू अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.
नारायण राणे लोप पावत चाललेलं अस्तित्व
कोकणातील ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी यापूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन आणि आता नाणार रिफायनरीला विरोध केला आहे याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, त्यांच्या भूमिकेबाबत मला बोलायचं नाही, पण राणे म्हणजे लोप पावत चाललेलं अस्तित्व असल्याची टीका यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली