रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पाला आणखी एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. विरोधामुळे चर्चेत असलेला हा आईल रिफायनरी प्रकल्प सामंजस्य करारामुळे पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे, या प्रकल्पासाठी चक्क मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली. मुंबईत १८ फ्रेबुवारीला होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबत सामंजस्य करार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिवसेनेसाठी जोर का झटका असणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त कोणती भुमिका घेतात याकडे लक्ष्य लागणार आहे.
नाणार पंचक्रोशीत प्रस्तावीत आईल रिफायनरी प्रकल्प विरोधामुळे चर्चेत आला. शिवसेना, काॅग्रेस, मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या राजकीय संघटनानी या प्रकल्पाला उघड विरोध केलाय. मात्र आता हा प्रकल्प रेटण्यासाठी एक पाऊल पुढे पडतंय. नाणार आॅईल रिफायनरी प्रकल्पासाठी १६ हजार एकर जमिन आवश्यक आहे. या प्रकल्पामध्ये १.४५ लाख करोड रुपयांची गुंतवणुक होणार आहे. इंडियन ऑईल, हिंस्दुस्थान प्रेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्या संयुक्तरित्या हा प्रकल्प उभारणार आहेत. या तीन कंपन्यासोबत राज्य सरकार सामजस्य करार करण्यात आहे. पुढील आठवड्यात या करारावर शिक्कामुर्तब होणार असल्याची खात्रीलायक माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळतेय. मुंबईतल्या १८ फ्रेबुवारीला मुंबई होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबत सामजस्य करार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधातली ठिणगी आणखी प्रखर होणार आहे. त्यामुळे मॅग्नेटिक परिषदेत यासाठीचा करार होवून या प्रकल्पावर मुख्यमंत्री शिक्कामुर्तब करणार अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे आता प्रकल्पासाठीचा करार करून भाजपा हा प्रकल्प रेटून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार एवढं मात्र नक्की.















