
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील प्रस्तावीत नाणार आईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ मुंबईत धडकणार आहेत. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी हि माहिती आज रत्नागिरीत दिली आहे. येत्या 27 नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्तांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन होणार असल्याचं वालम यांनी सांगितलं आहे.
रिफायनरी विरोधी आंदोलन आता आणखी तिव्र होणार आहे. कारण आता पुन्हा एकदा 27 नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाविरोधात मुंबईत धरणे आंदोलन होणार आहे. हा विनाशकारी प्रकल्प आम्हाला नको. यासाठी नाणार प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी एल्गार केला आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्तांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार आहे असे अशोक वालम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. सलग पाचव्यांदा अधिवेशनाच्या काळात हे धरणे आंदोलन होणार आहे. नाणार पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. याआगोदर दोन वेळा नागपूर आणि दोन वेळा मुंबईतल्या अधिवेशना दरम्यान नाणार प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं होते.पण अद्यापही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे डोळे अजून उघडलेले नाहीत. त्यामुळेच पुन्हा आता हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चाकरमान्यांची सभा होणार आहे. १८ नोव्हेंबरला हि सभा होणार आहे.
दरम्यान नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी शासनाने नेमलेल्या सुखठणकर समितीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. जे कोण या समीतीबरोबर बोलणी करणार असतील ते दलाली करणारे आहेत, अशी टिका वालम यांनी यावेळी केली