
रत्नागिरी, प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे. रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला ‘सोडसत्र’ सुरूच आहे. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी आज शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील 100 हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीनं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेची सत्ता असलेल्या गोवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप महाराष्ट्र राज्य सचिव व रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार व दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन व राजापूरचे भाजप तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूरमधील गुरुमाऊली सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक शिवसैनिक विकासाच्या मुद्द्यावर उघडपणे रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राजापूरमधील काही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान जवळपास दिड वर्षांपुर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मात्र तब्बल दिड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भुमिका बदलत नाही हे पाहून आज मंदाताई शिवलकर आणि सागवे, कात्रादेवी, गोठीवरे,घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, गोवळ येथील रिफायनरी समर्थक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्द्यावरून आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये सांमना रंगण्याची शक्यता आहे. पण विशेष म्हणजे निष्ठावान शिवसैनिक शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याने शिवसेनेला आता विचार करण्याची वेळ आलेली आहे.
प्रवेश कोणी केला
गाव – कात्रादेवी, गोठीवरे,घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिक
मंदाताई शिवलकर (जि. प. सदस्य), अरुण गुरव, महेश बोटले, विशाल तांबे, बापू घाटे, विद्याधर राजे (माजी सरपंच) प्रकाश पाटकर, शिवराम सागवेकर, सुशिल तांबे, साहिल गुरव, अनंत गुरव, अरुण गुरव, साहिल गुरव, निखील गुरव, बापू गुरव, यशवंत गुरव, सुभाष गुरव, सुरेश गुरव, संदीप गुरव, सुंदर गुरव, दिनेश गुरव, महेश गुरव, प्रणय गुरव, प्रदीप गुरव, केतन गुरव, संजय गुरव, संकेत गुरव, प्रशांत गुरव, ओंकार गुरव, मयुरेश गुरव, शंकर गुरव, सुशांत गुरव, प्रविण गुरव, प्रकाश गुरव, ओमकार गुरव, सुशमा गुरव, अनुष्का गुरव, सानिका गुरव, स्मिता गुरव, करिष्मा गुरव, दिशा गुरव, मानसी गुरव, योगिता गुरव, मनिषा गुरव, प्रतिक्षा गुरव, सुरेखा गुरव, वैभव मेस्त्री, विनायक कुवेसकर, परेश गिरकर, विजय सकपाळ, गणेश कुलकर्णी, सुजय वास्कर, वैभव पवार, मनिश मेस्त्री, सिध्देश राजे, अवधूत जाधव, प्रज्योत खांडेकर, अक्षय जामसांडेकर, सूर्यकांत पुजारी, महादेव येरम, दत्तात्रय मेस्त्री, कृष्णा येरम, सिध्देश येरम, रवळनाथ शिवलकर, रोहन मयेकर, संदीप मयेकर, विनायक मयेकर, गिरीश वाघधरे, संकेत मयेकर, मच्छिंद्र शिरसेकर, अमेय मयेकर, गुरुप्रसाद मयेकर, जितेंद्र वाघधरे, सागर मयेकर, विद्याधर मयेकर, सुरेंद्र मयेकर, समीर मेस्त्री, दिनेश चव्हाण, मंदार कांबळी, प्रविण सुर्वे, प्रविण खांबल, मंगेश घाडी, संजय जोशी…
शिवसेनेची गोवळ ग्रामपंचायत भाजपमध्ये
विकासाभिमुख काम करण्यासाठी गोवळ ग्रामपंचायतचे अभिजीत कांबळे(सरपंच), प्रिया रोकडे (उपसरपंच) प्रशांत गुरव, संतोष गुरव, प्रज्ञा गोखले, समिधा कातळकर, जयवंत गुरव, गोपाळ पिठलेकर, अंकुश घाडी, प्रकाश पळसमकर, रविंद्र कदम, तेजस भाटले, सायली मयेकर, विश्वनाथ सोगम, सोनल भाटले, विनायक बंडबे, विनायक जोशी, अविनाश जोशी, राकेश जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.