रत्नागिरी, (आरकेजी) : जैतापूर अणु उर्जा प्रकल्पापाठोपाठ नाणारमध्ये होणार्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मच्छिमारांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. त्यांनी एकत्र येय आता स्वतंत्र संघर्ष समिती स्थापन केली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार इथे दोन लाख कोटींचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. १४ गावातल्या १३ हजार हेक्टर जमिनी या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणार आहेत. याआधी प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समिती स्थापन केली होती. तीने या प्रकल्पाविरोधात मवाळ भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रकल्पाच्या बाजूने झुकल्याचे चित्र निर्माण झाल आहे. मात्र, आता या प्रकल्पाच्या विरोधात मच्छिमारांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी रिफायनरी विरोधात मच्छिमारांनी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.
४०० मच्छिमारांनी एकत्र येत रिफायनरी प्रकल्पाला विरोध सुरु केला आहे. नाणार, सागवे आणि कातळी अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छिमार समाज आहे. जवळपास एक हजार कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे मच्छिमारी व्यवसायावर संकट येईल, अशी भीती मच्छिमारांना आहे. त्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद होण्याची भीतीने मच्छिमारांनी संघर्ष सुरु केला आहे.