~ निफ्टीने इंट्रा डेमधील सर्वोच्च १५,५७३चे शिखर गाठले ~
मुंबई, ३१ मे २०२१: बेंचमार्क निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात सर्वोच्च कामगिरी बजावली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टीने रिलायन्सच्या नेतृत्वात इंट्रा डेमधील सर्वोच्च १५,५७३ चे शिखर गाठले. या शेअरने मजबुतीकरण साधत निफ्टीत सर्वाधिक वाटा घेतलेला आहे. सकारात्मक हालचाल असल्याने बाजारासाठी ही चांगली बातमी ठरणार आहे.बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनीही सध्याच्या वृद्धीला आधार दिला. यात एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टीसीएस अँड इन्फोसिस या काही स्टॉक्सचा समावेश आहे. डेरिव्हेटिव्हज डेटादेखील सतत तेजीत राहिला आहे. यामुळेही वृद्धीला गती मिळाली.
आशियाई बाजारपेठ कमकुवत असताना हे सर्व घडले. लॉकडाऊनच्या भीती नाहीशी होत, पुढील तिमाहीत चांगल्या आर्थिक सुधारणांची आशा आहे. तथापि, सध्या बाजार विक्रमी पातळीवर आहे. अशा स्थितीत अस्थिरता असते. त्यामुळे सावधगिरी अवश्य बाळगावी.