टाळेबंदीच्या काळात, आपण रोजच्या आहारात चिकनचा समावेश करण्यासाठी पटकन होणाऱ्या आणि मनोरंजक पाककृती शोधत असाल, तर ‘गोदरेज रियल गुड चिकन’च्या सहकार्याने सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार यांनी सादर केल्या रेसिपी’
—————
‘गोदरेज रियल गुड चिकन’च्या सहकार्याने सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदार
चिकन मोमोज्
लागणारा वेळ : 60 मिनिटे
किती व्यक्तींसाठी : 3
साहित्य :
आवरण बनविण्यासाठी :
1 वाटी मैदा,
दोन तृतियांश कप पाणी
चवीपुरते मीठ
4 मोठे चमचे गव्हाचे पीठ (वरून लावण्यासाठी)
सारण बनविण्यासाठी :
पाव किलो चिकनचा खिमा
1 चमचा बारीक कुटलेला लसूण
100 ग्रॅम लाल कांदे, बारीक चिरलेले
100 ग्रॅम मशरुम, बारीक केलेला (आवडत असल्यास)
मीठ आवश्यकतेनुसार
1 मोठा चमचा गोडेतेल
अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड
कृती :
कणीक बनविणे :
1. मैदा व थोडे मीठ घ्या. एकमेकांत चांगले मिसळा.
2. पाण्याला उकळ्या येईपर्यंत ते तापवा.
3. हे उकळलेले पाणी मैद्यामध्ये घाला. मिसळून घ्या.
4. कणीक घट्ट मळून ती मऊसर बनवा.
5. ओल्या कपड्यामध्ये ही कणीक बांधून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा.
सारण बनविणे :
1. दुसऱ्या एका भांड्यात, सारणासाठीचे सर्व जिन्नस एकत्र करून ढवळा व बाजूला ठेवून द्या.
सारण भरणे व वाफवणे :
1. कणीक पुन्हा परातीत काढून तिंबून घ्या.
2. कणकेचा रोल तयार करा आणि 2 सेंटीमीटर लांबीचे गोळे कापा. या गोळ्यांच्या 4 इंच व्यासाच्या पुऱ्या लाटा. पुऱ्यांवर वरून लावण्यासाठी गव्हाचे पीठ वापरा.
3. पुरीच्या मध्यभागी थोडे सारण ठेवा. पुरीच्या कडांना पाण्याचा हात लावा आणि बोटांच्या चिमटीत पकडून त्यांचा द्रोण बनवा. यापूर्वी कधीही हे काम केलेले नसेल, तर ही कृती सावकाश, काळजीपूर्वक करा. या द्रोणाच्या कडा एकमेकांवर दाबून अर्धचंद्राकृती करंजी तयार करा. करंजीच्या कडांवर कटर किंवा उलथने फिरवून त्यांचा आकार व्यवस्थित गोल करून घ्या.
4. कढईत एक कप पाणी घ्या. त्यावर चाळणी उलटी ठेवा किंवा स्टीमर वापरा.
5. चाळणीवर कोबीची पाने किंवा बटर पेपर अंथरा.
6. त्यावर आकार देऊन झालेले मोमोज् सावकाश ठेवा. चाळणीवर मोमोजची गर्दी होऊ देऊ नका.
7. कढईवर झाकण ठेवा. गॅसची आच मोठी ठेवून मोमोज 12 मिनिटे वाफवून घ्या.
8. गरम असतानाच हे मोमोज सर्व्ह करा.
—————————————————————————————————————————————————————————-
पॅन तंदुरी चिकन
लागणारा वेळ : 45 मिनिटे
किती व्यक्तींसाठी : 4
साहित्य :
1 पूर्ण चिकन, 10 ते 12 तुकडे केलेले
200 ग्रॅम दही
1 मोठा चमचा सॉल्टेड बटर
1 चमचा हळद
2 मोठे चमचे लिंबाचा रस
2 मोठे चमचे लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा चाट मसाला
आवश्यकतेनुसार मीठ
1 मोठा चमचा आले-लसूण पेस्ट
2 मोठे चमचे तेल
कृती :
- धारदार सुरीच्या सहाय्याने चिकनच्या तुकड्यांवर थोड्या चिरा पाडा. या तुकड्यांना मीठ व हळद लावा. 15 मिनिटांकरीता ते बाजूला ठेवा.
2. बाऊलमध्ये इतर सर्व साहित्य एकत्र घ्या व त्याचे चांगले मिश्रण तयार करा.
3. चिकनचे तुकडे घेऊन त्यांवर हे मिश्रण लावा.
4. तव्यावर गेल गरम करा व त्यांत हे चिकनचे तुकडे एकाच थरात मांडा.
5. गॅसच्या मोठ्या आचेवर हे तुकडे सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून घ्या व त्यांना सोनेरी तांबूस रंग येऊ द्या. याला 10 मिनिटे लागतील. चिकनमधील रस यामुळे आटून जाईल.
6. चिकनमधील रस आटल्यावर गॅसची आच मंद करा. तव्यावर झाकण ठेवा. 15 मिनिटे किंवा चिकन चांगले शिजेपर्यंत हे झाकण राहू द्या. झाकण काढून चिकनवर बटरचा थर द्या.
7. चिरलेला कांदा,लिंबू किंवा कांद्याच्या पातीसह हे चिकन वाढा.
———————————————————————————————————————————————————————————
ट्रायबल चिकन करी
लागणारा वेळ : 30 मिनिटे
किती व्यक्तींसाठी : 4
साहित्य :
अर्धा किलो चिकन, हाडांसह, स्वच्छ केलेले व लहान तुकड्यांमध्ये
1 वाटी दही
2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
अर्धी वाटी कांद्याची पात
1 वाटी पाणी
आवश्यकतेनुसार मीठ
2 हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
कृती :
- गव्हाचे पीठ,पाणी,दही आणि सर्व कोरडे मसाले बाऊलमध्ये एकत्र घेऊन मिश्रण चांगले ढवळा.
2. या मिश्रणात चिकनचे तुकडे, कांदा पात, मीठ व मिरच्या घाला आणि ढवळून घ्या.
3. कुकरमध्ये हा सर्व जिन्नस घ्या. होय, ही करी बनविण्यास तेल लागत नाही. सर्व जिन्नस एकत्र ढवळून शिजवून घेणे, एवढेच यात करायचे असते. खूपच वेगळी कृती आहे ही, हो ना?
4. कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर 20 मिनिटे शिजवा किंवा चिकनचे तुकडे नीट शिजेपर्यंत उकडून घ्या.
5. भाकरीसोबत गरमागरम करी वाढा.