
![]()
![]()
– योजनेमुळे व्होडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना कनेक्टेड राहाण्यास मदत होणार
– लघु उद्योग तसेच व्यक्तीगत पातळीवर अधिक उत्पन्न मिळवण्याची क्षमता
– सोप्या नोंदणी प्रक्रियेसह कोणालाही आपल्या पेटीएम अपवर व्होडाफोन आणि आयडिया रिचार्जची विक्री करता येणार
मुंबई : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा प्लॅटफॉर्म असलेली पेटीएम आणि भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार व्होडाफोन आयडियाने खास भागिदारी केल्याचे जाहीर केले. या भागिदारीमुळे पेटीएमला ‘रिचार्ज साथी’ या योजनेअंतर्गत व्होडाफोन आयडियासाठी प्रीपेड मोबाइल फोन रिचार्ज करण्याची विशेष क्षमता मिळणार आहे.
या योजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही पेटीएम ग्राहकाला फार्मसिस्ट, दूध केंद्राचे चालक, वर्तमानपत्र विक्रेते किंवा सुरक्षा रक्षकासारख्या एखाद्या व्यक्तीलाही कोणताही व्होडाफोन आयडिया क्रमांक रिचार्ज करून उत्पन्न मिळवता येईल. सर्व रिचार्ज आणि व्यवहार पेटीएम अपवर प्रीपेड/पोस्टपेड पेमेंट सेक्शनमध्ये ‘स्टे अट होम इसेन्शियल्स’ विभागाअंतर्गत सुरक्षितपणे करता येणार आहेत.
व्होडाफोन आयडियाच्या रिचार्ज साथी योजनेमुळे लघुउद्योजक तसेच व्यक्तीगत पातळीवर अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणार आहे. केवळ पेटीएम अप डाउनलोड करून मोबाइल रिचार्जची विक्री करता येणार आहे. एकापेक्षा जास्त रिचार्ज केल्यास व्होडाफोन आयडियाद्वारे मर्चंट भागिदारांना खात्रीशीर कॅशबॅकही दिला जाणार आहे. व्यक्तीगत पातळीवर किंवा लघुउद्योगांना रिचार्ज साथी योजनेअंतर्गत दरमहा अतिरिक्त 5000 रुपये मिळवता येणार आहेत.
मोबाइल फोन रिचार्जेससाठी पेटीएम हे देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. गेल्या काही ठवड्यांत कंपनीने कोव्हिड- 19 विरोधात लढा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून त्यामुळे नागरिकांना आपल्या घरात सुरक्षित राहून वेगवेगळ्या प्रकारची पेमेंट्स करणे शक्य झाले आहे. कंपनीने आपल्या अपचे नूतनीकरण केलेले असून युटिलिटी बिल्स, मोबाइल फोन आणि डीटीएच रिचार्जसारख्या आवश्यक पेमेंट्सना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे पेटीएमला देशभरात मोबाइल फोन रिचार्ज विभागात 42 टक्के वाढ दिसून आली आहे.
पेटीएमच्या व्यवसाय विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभय शर्मा म्हणाले, ‘लोकांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. प्रीपेड मोबाइल फोन रिचार्ज हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. आम्ही आधीपासूनच भारतात रिचार्जसाठीचे सर्वाधिक पसंती असलेला पर्याय आहोत आणि आता व्होडाफोन आयडियाबरोबर झालेल्या भागिदारीमुळे देशभरातील आमची व्याप्ती अधिक विस्तारण्यास मदत होईल.’
व्होडाफोन आयडियाचे विपणन संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘आमचे ग्राहक सदैव विशेषतः देशभर लॉकडाउन असताना कायम इतरांच्या संपर्कात राहातील याची खात्री करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. पेटीएमबरोबर झालेल्या भागिदारीमुळे आम्हाला डिजिटल पातळीवर उपलब्ध नसलेल्या कित्येक प्रीपेड ग्राहकांना रिचार्जसाठी घराबाहेर न पडता कनेक्टेड राहाण्यास मदत करता येईल. या भागिदारीमुळे व्यक्तीगत पातळीवर आणि लहान उद्योगांना डिजिटली कनेक्टेड राहात अतिरिक्त उत्पन्नही मिळवता येईल. ’
भारतात मा- मिमोची सर्वाधिक अंमलबजावणी करण्यापासून केंद्रीय एसएनओसीद्वारे 24×7 नेटवर्क देखरेख करण्यापर्यंत, एखाद्या योद्ध्याप्रमाणे काम करणाऱ्या फील्ड इंजिनियर्सच्या मदतीने दुर्गम भागापासून सगळीकडे नेटवर्कमधील अडचणी त्वरित दुरुस्त करण्यापासून व्होडाफोन आयडियाने सध्याच्या या कठीण काळात ग्राहकांना विनाअडथळा कनेक्टिव्हिटी पुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एटीएम, एसएमएसद्वारे रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली असून डिजिटल सॅव्ही असलेल्या ग्राहकांना ‘रिचार्ज फॉर गुड’ या उपक्रमाअंतर्गत मित्रपरिवार व कुटुंबियांसाठी रिचार्ज करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.














