नवी दिल्ली : रिअर ॲडमिरल राजेश पेंढारकर यांनी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे प्रमुख म्हणून 25 मार्च 2019 रोजी कार्यभार स्वीकारला. एनडीएचे विद्यार्थी असलेले पेंढारकर जानेवारी 1987 मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाले. पाणबुडीरोधक युद्धशास्त्रातले ते तज्ज्ञ मानले जातात. यापूर्वी आयएनएस क्रिपान, आयएनएस म्हैसूर, आयएनएस कोरा, आयएनएस शिवालिक आणि आयएनएस विराटसारख्या युद्धनौकांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. उल्लेखनीय सेवेबद्दल पेंढारकर यांना ‘विशिष्ट सेवा’ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे