
मुंबई : भारतातील अव्वल दर्जाचा उदयोन्मुख स्मार्टफोन ब्रॅंड रीअलमीने आपल्या पहिल्यावहिल्या ६४ मेगा पिक्सल क्वाड कॅमेरा फोनसंबंधी योजनांचा खुलासा केला. कंपनी हा फोन दिवाळीपूर्वी लॉन्च करणार असून ६४ एमपी क्वाड कॅमेरा फोन लॉन्च करणारा भारतातील पहिला ब्रॅंड बनण्याचा मान रीअलमीला मिळणार आहे. कंपनीने नुकतेच दिल्ली येथे आयोजित आगळ्यावेगळ्या कॅमेरा इनोव्हेशन कार्यक्रमात उपस्थितांना या फोनचा जगातला पहिला प्रायोगिक अनुभव दिला.
रीअलमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव शेठ म्हणाले, “आमच्या अगदी पहिल्या उत्पादनापासून आम्ही निरंतर भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक, प्रीमियम स्मार्टफोन अनुभव देत आहोत, तेही बेताच्या किंमतीत. आमच्या याच दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, आमचे नवीन उत्पादन, जे जगातील पहिल्या ६४ एमपी क्वाड कॅमेरा सोल्युशनने सज्ज आहे. या ‘इमेजिंग लीप’ सह आम्ही नेक्स्ट जनरेशन, अभूतपूर्व फीचर्स देऊन भारतातील तरुण आणि महत्त्वाकांक्षी यूझर बेसला खुश करू शकू असा विश्वास आम्हाला वाटतो.”
रीअलमीच्या या नवीन उत्पादनासह स्मार्टफोन इमेजिंग टेक्नॉलॉजीच्या नवीन युगाचा आरंभ झाला आहे. त्यांच्या मुख्य अनुभवात ‘इमेजिंग लीप’ हा मूलभूत घटक आहे. या घटकासह या नवोदित ब्रॅंडने किफायती किंमतीत अत्याधुनिक टेक्नॉलॉजी देण्यासाठी नेहमी आपल्या क्षमता अधिक उंचावल्या आहेत. त्यांनी अलीकडेच ४८एमपी सोनी आयएमएक्स५८६सह रीयलमी एक्स लॉन्च केला आहे. तर आता त्यांनी ‘फुल फंक्शन क्वाड कॅमेरा सिस्टम’ सादर केली आहे, जी भारतीय ग्राहकांना अभूतपूर्व असा फुल-फीचर्ड मल्टी-सीन इंटिग्रेटेड इमेजिंग अनुभव देईल.














