
रत्नागिरी : आमदार भास्करराव जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत बँकेचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो या वर्षाचा अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये बँकेची होत असलेली प्रगती अत्यंत समाधानकारक अशी आहे. अनेक प्रगतीची ध्येय ओलांडून बँकेने ग्रामीण दुर्गम भागातील शेतकऱ्यांना डिजिटल प्रवाहात आणून डिजिटल बँकिंग व्यवहारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, याबद्दल मला अभिमान आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
तसेच, बँकेचे संचालक व कर्मचारी यांचे त्यांनी अभिनंदन व आभार मानले असून, त्यांच्या या सकारात्मक दृष्टी व बँकेबद्दलची आस्ता सर्वांना ऊर्जा देणारी आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. आमदार भास्करराव जाधव यांच्या या आपुलकी व प्रोत्साहन देणाऱ्या पत्राबाबत बँकेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.














