रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध खात्यांत होणाऱ्या मेगाभरतीला स्थिगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यावेळी मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघत होते, त्यावेळीच याची गंभीर दखल घेतली असती तर अशी स्थिती उदभवली नसती असा टोला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी लगावला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात पुन्हा बंद, आंदोलनं आणि मोर्चे निघत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणंही लागलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मराठा समाजाला शांततेचं आवाहन करत राज्य सरकारकडून आगामी काळात होणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे. राज्याचा मुख्य म्हणून त्यांनी याबाबत सर्व गोष्टींचा विचार करावा, आणि त्यांनी तो केलाही असेल तर त्यांच्या दृष्टीने तो योग्य असेल, काहींच्या दृष्टीने योग्य नसेल. पण त्यातून निर्णय निघणं हे महत्त्वाचं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण बाकीच्या आरक्षणाला धक्का न लावता. पण हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं, ज्यावेळी शांततेत मराठा समाजाचे मोर्चे निघत होते त्यावेळीच याबाबत गंभीर दखल घेणे गरजेचं होतं असा टोला वाय
कर यांनी लगावला आहे..