रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर व सिंधुदूर्ग रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत.
असा आहे दौरा
मंगळवार 30 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 कि.मी. ची पाहणी. सकाळी 11.00 ते 12.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12.00 ते 01.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 02.00 ते 03.00 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 ते 03.30 वाजता मुंबई-गोवा महामार्ग चिपळूण ते परशुराम घाट या 11.40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 03.30 ते 04.15 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 4 परशुराम घाट ते कशेडी घाट या 42.30 किमी ची पाहणी. दुपारी 04.15 ते 05.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 3 किमीची पाहणी.