रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात स्वाभिमान विरोधात शिवसेनेने दंड थोपडले असून नारायण राणेंच्या गुंडगिरीला थेट आव्हान दिले आहे. राणेंनी शिवसेनेशी जाणूनबुजून वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा दिला आहे. यामुळे कोकणात राणे विरोधात शिवसेना वाद उफाळून येणार आहे.
रत्नागिरीत सध्या स्वाभिमान विरुद्ध शिवसेना यांच्यात जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानच्या अमित देसाई या कार्यकर्त्याला एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली होती, मात्र स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला झालेल्या धक्काबुक्की नंतर रत्नागिरी शहराचे शिवसेनेचे उप शहरप्रमुख बावा चव्हाण यांच्या दुकानावर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरीचे पोलीस गृहराज्यमंत्र्यांच्या दबावाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांवर एकांगी कारवाई करत आहेत असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. तर गुंडगिरी हि राणेंच्या पाचवीला पुजलेली आहे, शिवसेनेला आव्हान देऊ नका जाणूनबुजून वाकडं वागण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना वाघाची औलात आहे शेलपटानी वाघाशी टक्कर घेऊ नये असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत दिला आहे. रत्नागिरीत शिवसेना विरुद्ध स्वाभिमान असा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. दोन दिवस घडलेल्या घडामोडीनंतर खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की दोन दिवसांपासून निलेश राणे पुरस्कृत गुंडांकडून झुंडशाही सुरु आहे, यापूर्वी देखील त्यांची झुंडशाही सुरु होती. मात्र 4 वर्षांपूर्वी जनतेने यांना घरी बसवल्यानंतर हा प्रकार थांबला होता, पण आता पुन्हा यांची गुंडगिरी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष सुसंस्कृतपणे आपली वाटचाल करीत आहेत, आजवर झालेल्या निवडणुका शान्तत्तेत पार पडल्या, मात्र ठिपक्या एवढ्या पक्षाने आता पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, हे कदापि सहन करणार नाही असे राऊत यांनी यावेळी सांगितले. शिवसेना उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले कि हा हल्ला निलेश राणे पुरस्कृत होता.स्वाभिमान पक्षाच्या भाडोत्री गुंडांनी हा हल्ला केल्याचं राऊत म्हणाले. तसेच बुधवारी रात्री शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप यांच्या ढाब्यावर जाऊन दमदाटी व शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. 10 ते 15 गाड्या दहशतीचे वातावरण निर्माण करायचे या प्रकाराचा शिवसेना धिक्कार करत असल्याचं राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले. आता तर सुरुवात आहे अशी दळभद्री वक्तव्य एका माजी खासदाराने करणे हे दुर्दैवी आहे. गुंडगिरी हि त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे असंही राऊत यावेळी म्हणाले.
… तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ – निलेश राणे
दरम्यान अमित देसाई मारहाण प्रकरणात निलेश राणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की आम्ही ज्यांची नावे दिली त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कोणी अरविंद बोडके गुन्हा नोंदवायला तयार नाहीत, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गृहराज्यमंत्री त्यांचे असले तरी सिंधूदुर्गत त्यांचे काही चालत नाही, आमचा गुन्हा दाखल न झाल्यास मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ असं निलेश राणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
… तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ – निलेश राणे
दरम्यान अमित देसाई मारहाण प्रकरणात निलेश राणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की आम्ही ज्यांची नावे दिली त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कोणी अरविंद बोडके गुन्हा नोंदवायला तयार नाहीत, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गृहराज्यमंत्री त्यांचे असले तरी सिंधूदुर्गत त्यांचे काही चालत नाही, आमचा गुन्हा दाखल न झाल्यास मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ असं निलेश राणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.