रत्नागिरी दि. 12: जिल्ह्यात 24 तासात सरासरी 115.86 मिमी तर एकूण 1042.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 137.00 मिमी, दापोली 79.10 मिमी, खेड 118.10, गुहागर 132.60 मिमी, चिपळूण 123.40 मिमी, संगमेश्वर 102.90 मिमी, , रत्नागिरी 72.50 मिमी, राजापूर 153.50 मिमी,लांजा 123.60 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 12 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे परशुराम येथील घाटात दरड कोसळली. सदर ठिकाणी सा.बां. विभागाने दरड हटविण्याचे काम चालू. एकेरी वाहतूक सुरु आहे.
राजापूर तालुक्यात मौजे कोंडेतर येथे सकाळी 08.00 वा. च्या दरम्यान एक व्यक्ती अंदाजे वय वर्षे 45 ही मच्छीमार्केटला जोडणाऱ्या पुलावरुन जाताना पाण्यात वाहून गेला आहे. नाव अद्याप कळू शकले नाही. शोधकार्य सुरु आहे.















