रत्नागिरी दि. २७ : राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 या 4 महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने (गहू रु.8/- प्रतिकिलो व तांदूळ रु.12/- प्रतिकिलो) प्रतिमहा प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. मात्र ब-याच जिल्हयामध्ये सदर योजनेतील अन्नधान्य शिल्लक असल्यामुळे शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांजकडील पत्र क्रमांक अधापु-2021/प्र.क्र. 29/नापु-22 दिनांक 25 मे, 2021 अन्वये जिल्हयातील शासकीय गोदामांमध्ये तसेच रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रामाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून, 2021 करीता सवलतीच्या दराने (गहू रु.8/- प्रतिकिलो व तांदूळ रु.121- प्रतिकिलो) प्रथम मागणी करणा-यास देणे (FIRST COME, FIRST SERVE) या तत्वानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
तरी आपली एपीएल (केशरी) शिधापत्रिका ज्या रास्तभाव दुकानास संलग्न आहे, त्या रास्तभाव दुकानातून आपणास देय असलेले शासन अनुदानित दराने शिधाजिन्नस लवकर प्राप्त करून घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.