रत्नागिरी : जागतिक एड्स दिनानिमित्त Know your status या घोषवाक्यास अनुसरुन सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी एड्सविरोधी जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हिरवा झेंडा दाखवून या प्रभातफेरीचा
शुभांरभ केला. सदरची एड्स जनजागृती प्रभातफेरी जिल्हा शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ मार्गे एसटी स्टँड, रत्नागिरी येथे वळसा घेऊन पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे समाप्त झाली . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक श्रीमती फुले, आदि मान्यंवर तसेच नर्सिंग कॉलेज, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, गोगटे जोगळेकर कॉलेज, आयटीआय, शासकीय अध्यापक महाविद्यालय, फिशरीज कॉलेज, यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेज, महर्षि कर्वे कॉलेज, पोलीस बँण्ड पथक आदिं या प्रभातफेरीमध्ये सहभागी झाल्या.
एड्स जनजागृती करणाऱ्या तसेच रक्तदान शिबीर आयोजन करणाऱ्या जाणीव फाऊंडेशन, रत्नागिरी, जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थान, नाणीज, रत्नागिरी, जीवनदान ग्रुप, रत्नागिरी, संतनिंरकारी मंडळ, रत्नागिरी, आधार सेवा ट्रस्ट, रत्नागिरी या संस्थांचा योवळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.