रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गुरवारीही पावसाचा जोर कायम होता. विशेषतः उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपलं आहे. जून महिन्यात सुरु झालेला पाऊस आजपर्यँत सलग संततधार कोकणात बरसताना पहायला मिळतोय. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. कधी उत्तर रत्नागिरी तर कधी दक्षिण रत्नागिरीला पाऊसाचा जोर असतो. दरम्यान गेल्या चौविस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ८६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात पडला असून, दापोलीत तब्बल १४५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मंडणगड आणि चिपळूणमध्ये ११० मिलिमिटर, खेडमध्ये १०२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून सुद्धा दक्षिण रत्नागिरीपेक्षा उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर पहायला मिळतोय.मुसळधार पावसानं नद्या नाले ओसंडून वाहात आहेत. विशेषतः उत्तर रत्नागिरीतील नदांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आज. तर खेड मधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनानं जनतेला सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा दिला आहे. खेड नगरपरिषदेनं सुद्धा या बाबात खबदरी घेतली आहे. १ जूनपासून आज पर्यत पावसानं १४८९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास ५०० मिलिमिटर पाऊस अधिक झाला आहे.