रत्नागिरी, 3 August : रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने आज कोव्हिड योद्ध्यांसाठी रक्षाबंधनाचा आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला.
कोरोनाच्या संकट काळात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस, आरोग्य कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी हे अहोरात्र परिश्रम करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या सर्व लोकांनी जनतेचे संरक्षण व जनजागृतीचे काम केले. या कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने एक आगळेवेगळे पाऊल उचलले. राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाचा आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला.
राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य सदस्यांनी रत्नागिरी शहरातील कोव्हिड योद्ध्यांना रक्षाबंधन केले. विशेष म्हणजे पुरुष सदस्यांनी महिलांना व महिला सदस्यांनी पुरुषांना असे आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन केले. यावेळी कोव्हिड योद्ध्यांनी देखील राजरत्न प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व सदस्यांना आशिर्वाद दिले.