रत्नागिरी : मच्छीमारीसाठी गेलेल्या एका छोट्या बोटीला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीतील चौघांचा यावेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यास स्थानिक नागरिकांना यश आले आहे.
समुद्रातील वादळी स्थितीमुळे समुद्र खवळलेला होता. समुद्रातील अजस्त्र लाट या बोटीवर आपटल्या आणि ही बोट काही क्षणात समुद्रात पलटी झाली. या बोटीत जैनुदिन पठाण, अब्बास पठाण आणि हसन पठाण आणि तवक्कल वांगी असे चौघे खलाशी होते. समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्यात हे चौघे आत ओढले गेले. हसन पठाण आणि जैनुद्दीन पठाण आणि अब्बास पठाण हे तीघे सख्खे भाऊ आहेत. रात्रीपासून स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंगळवारी सांयकाळपर्यंत हसन आणि जैनुदिन पठाण या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, पोलिस वगळता सरकारी यंत्रणेकडून कुठलीच मदत मिळली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.