रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी एकूण २२९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी एकूण २९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज एकूण ७० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
दापोलीत जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी ३० उमेदवार लढत देत आहेत. येथे ९ जणांनी माघार घेतल्यामुळे आता ६ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत.
खेडमध्ये ७ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४४ अर्ज दाखल झाले होते पैकी आज १४ जणांनी माघार घेतली.
गुहागरमध्ये ४ जागांसाठी एकूण २४ उमेदवारांनी अर्ज दाखल कले होते. सात जणांनी माघार घेतल्याने आता १७ उमेदवार रिंगणात आहेत.
चिपळूणमध्ये ९ जागांसाठी ९ जणांनी माघार घेतली. येथे अंतिम ३० उमेदवार रिंगणात आहेत.
संगमेश्वरमध्ये १६ जणांनी माघार घेतल्याने ७ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत.
रत्नागिरीत १० जागांसाठी ५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ७ जणांनी माघार घेतल्यामुळे ४४ उमेदवार रिंगणात आहेत.
लांजामध्ये ४ जागांसाठी १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ जणानी माघार घेतल्यामुळे १६ उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
राजापूरमध्ये ६ जागांसाठी २२ जण रिंगणात आहेत. २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २ जणांनी आज माघार घेतली .
मंडणगडमध्ये जिल्हा परिषदेच्या २ जागा आहेत. या जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, ३ उमेदवारांनी आज माघार घेतली.