
रत्नागिरी :रत्नागिरीतल्या कुवारबाव बाजारपेठ मधील तीन दुकानाना मध्यरात्री भिषण आग लागली.. या आगीत एक दुकान पूर्णतः जळून खाक झालं आहे. या आगीत ३२ लाखांचं नुकसान झालं आहे. कुवारबाव बाजारपेठेत बुधवारी मध्यरात्री आगीचं तांडव पाहायला मिळालं.. बाजारपेठेतील एका स्वीटमार्टच्या दुकानाला मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक आग लागली.. या आगीची तीव्रता एवढी होती, की इतर दोन दुकानांना झळ बसली.. दरम्यान आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.. त्यानंतर काही वेळात ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आलं.. आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.. मात्र या आगीत तिन्ही दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे.. जवळपास ३२ लाखांचं नुकसान या तिन्ही दुकानांचं आगीत झालं आहे. शॉर्टसर्किट मुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..















