रत्नागिरी : जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथील ५५ पैकी ३६ जागा शिवसेनेने जिंकल्या. यावेळी स्वबळावर लढणाऱ्या भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीला १६ जागा मिळाल्या.
प्रतिष्ठेच्या लढतींत फुरूस (खेड) गटामध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम विजयी झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे आणि जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर यांचा पराभव झाला.
करबुडे (रत्नागिरी) गटात जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे सतीश शेवडे यांचा पराभव झाला. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने विजयी झाले.
शिरगाव गटात भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने यांचा पराभव झाला. शिवसेनेचे रात्नागिरी उपतालुकाप्रमुख भाई सावंत यांच्या पत्नी स्नेहा सावंत यांचा विजय झाला.
कोसुंब (संगमेश्वर) गटात माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांच्यात लढत झाली होती. या गटात रोहन बने जिंकले.
कसबा जिल्हा परिषद गटात जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांचा विजय झाला आणि शिवसेनेतील बंडखोर आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम हे पराभूत झाले.
अंजनवेल (गुहागर) गटात भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव हे विजयी झाले. राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेले सुरेश सावंत यांचा पराभव झाला.
सावर्डे गटात शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या भगिनी युगंधरा राजेशिर्के यांनी त्यांचा पराभव केला.
आकडेवारी
रत्नागिरी जिल्हा परिषद जागा- ५५
शिवसेना – ३९
राष्ट्रवादी – १६
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पंचायत समिती जागा – ११०
शिवसेना- ७३,
भाजप -४
राष्ट्रवादी -३१
मनसे -१
काँग्रेस -१
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तालुकानिहाय आकडेवारी
रत्नागिरी- जिल्हा परिषद गट -१० जागा
शिवसेना – १०
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पंचायत समिती – २० गण
शिवसेना – १८
भाजपा -२
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
लांजा जिल्हा परिषद गट
जिल्हा परिषद जागा -२
शिवसेना -४
पंचायत समिती जागा-८
शिवसेना -७
काँग्रेस- १
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मंडणगड जिल्हा परिषद गट जागा -२
शिवसेना -१
राष्ट्रवादी – १
पंचायत समिती जागा -४
शिवसेना-२
राष्ट्रवादी-२
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
राजापूर जिल्हा परिषद गट-६
शिवसेना – ४
राष्ट्रवादी-२
पंचायत समिती जागा १२
शिवसेना-९
राष्ट्रवादी-३
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
चिपळूण जिल्हा परिषद गट-९
शिवसेना – ५
राष्ट्रवादी – ४
पंचायत समिती जागा -१ ८
शिवसेना – ९
राष्ट्रवादी-९
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
गुहागर एकुण जिल्हा परिषद गट जागा – ४
शिवसेना -१
राष्ट्रवादी -३
पंचायत समिती जागा- ८
भाजपा -१
शिवसेना – २ जागा
राष्ट्रवादी-५
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
खेड जिल्हा परिषद जागा – ७
शिवसेना -४
राष्ट्रवादी काँग्रेस -३
पंचायत समिती जागा- १४
शिवसेना-८
राष्ट्र्वडी – ५
मनसे-१
—-
संगमेश्वर जिल्हा परिषद गट-७
शिवसेना -७
पंचायत समिती जागा – १४
शिवसेना – १३
भाजपा – १
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
दापोली जिल्हा परिषद गट- ६
शिवसेना- ३
राष्ट्रवादी- ३
पंचायत समिती जागा – १२
शिवसेना -५
राष्ट्रवादी-७