रत्नागिरी, (आरके) : रत्नागिरीत अस्वच्छता पसरवणार्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यासंदर्भातला ठराव रत्नागिरी नगरपरिषदेत नुकताच मंजूर करण्यात आला आहे. नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.
कचरा रस्त्यावर जाळणे, प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणे, रस्त्यांवर थुंकणे असे प्रकार झाल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी १०० रुपयांपासून ते थेट २५ हजारापर्यंत दंड आकारण्यात येईल. ३२ तरतुदींचा भंग केल्यास दंडाची रक्कम आकारण्याला मान्यता दिली गेली आहे.
शहराला बकालपणा येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवलेल्या शिवसेनेने शहर स्वच्छतेसाठी हे पाऊल उचलले आहे.
दंडाची तरतूद
प्लँस्टिक कचरा जाळल्यास- २५ हजारांचा दंड
विकासकाने सांडपाणी निसारणाचा भंग केल्यास – ५ हजार दंड
कचरा पुर्नवापराचा भंग केल्यास- ५ हजारांचा दंड
रस्त्यावर थूंकल्यास – १०० रुपये दंड