
रत्नागिरी, 16 June : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये सोमवारी रात्रीपासून आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रत्नागिरीतील 3 दापोली 3 आणि कामथे येथील 8 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण 17 जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आणखी 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 308 एवढी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात आता 120 पॉझिटिव्ह रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.