रत्नागिरी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचार्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे दायित्व महाराष्ट्र सरकारने स्वीकारावे, यासाठी संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरीतही आंदोलन सुरू झाले आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण पाणी पुरवणार्या कर्मचार्यांना नियमीत वेतन व निवृत्ती वेतन मिळत नाही. यासाठी तीन दिवसांपासून प्राधिकरणाच्या कर्माचा-यांनी काळ्या फीती लावून आंदोलन केले, मात्र सरकारने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. रत्नागिरीत देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राधिकरणच्या कर्मचा-यांनी धरणे आंदोलन केले.