रत्नागिरी : रत्नागिरीतल्या राम रहीम बाबाविरोधात अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीने तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी सत्र न्यायालयाने भोंदू बाबाला २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राम रहीम, भोंदू बाबांचे प्रकरण ताजी असताना रत्नागिरीतील पाटील नावाच्या भोंदूने लोकांना शिवीगाळ करण्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी त्याविरोधात कारवाई केल्यानंतर त्याने जामिनावर सुटका करून घेतली. मात्र अंनिसने बाबा विरोधात स्थानिक पोलीस स्थानकात कारवाईचे निवेदन दिले. या निवेदनाच्या आधारे रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी या बाबाविरोधात फिर्याद दिली असून जादू टोणा विरोधी कायद्यांतर्गत पाटील बाबावर काल रात्री गुन्हा दाखल केला. मात्र दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बाबाला पुन्हा अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले असता रत्नागिरी सत्र न्यायालयाने २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.