रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीचे तटरक्षक दल देशाच्या पश्चिम क्षेत्रातील सर्वोत्तम बेस कॅम्प ठरला असून पश्चिम किनाऱ्यावरील २१ तटरक्षक दलाच्या बेस कॅम्प मधून रत्नागिरी तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पची निवड झाली आहे. त्यामुळेच या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी शहरालगत असलेल्या तटरक्षक दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. किनारी सुरक्षेसह आपत्कालीन कामगिरीची दखल यामध्ये घेण्यात आली आहे. यासाठी रत्नागिरीतील सात वर्षाच्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता. १६३ मैलांचे समुद्री कार्यक्षेत्र असलेल्या रत्नागिरी तटरक्षक दलाने अनेक शोध आणि बचाव कार्य यशस्वी केली आहेत.