रत्नागिरी : केंद्रीय नगरविकास खात्याकडून देशातील स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या मोहिमेत रत्नागिरी नगर परिषदेने बाजी मारली असून संपूर्ण भारतात चाळीसावा, राज्यात चोविसावा आणि पश्चिम भारतात सव्वीसावा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे ५ कोटीचे पारितोषीकास रत्नागिरी नगर परिषद पात्र ठरली आहे.फेब्रुवारी, मार्च महिन्यात संपूर्ण भारतातील शहरांचा सर्व्हे करण्यात आला होता. एक लाख लोकसंख्येच्या प्रवर्गात रत्नागिरी पालिकेने स्वच्छतेत चांगले काम केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना उद्युक्त करावे यासाठी केंद्र शासनाने देशातील ४०४१ स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेच्या अंगाने मूल्यमापन केले होते. त्यात रत्नागिरी नगर परिषदेने उत्तम कामगिरी करत हे यश संपादन केले आहे. ‘हे यश नागरिकांचे असून त्यांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. रत्नागिरीतील प्रत्येक नागरिकांचा या यशात मोलाचा वाटा आहे’ अशा भावना नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केल्या आहेत. परिक्षणात तीन हजार गुण ठेवण्यात आले होते. त्यात नागरिकांचा प्रतिसाद आणि कचर्याचे विलगीकीकरणाला चांगले गुण मिळाले; मात्र कचर्यावरील प्रक्रियेच्या परिक्षणात रत्नागिरी मागे आहे. कचर्यावरील प्रक्रियेच्या मुद्द्यात रत्नागिरीला कमी गुण मिळाले आहेत. दांडेआडोमची जागेवरुन न्यायालयीन प्रक्रियेत तर एमआयडीसीतील जागा तांत्रिक अडचणीत सापडली आहे. ती कमी भरुन काढत येत्या दोन महिन्यात स्वच्छतेच्या देशातील स्टार रेटींगमध्ये अव्वल स्थानक पटकाविण्याचा निर्धार केल्याचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी सांगितले.