रत्नागिरी, (आरकेजी) : कर्जमाफीसाठी आज शेतकर्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये शिवसेनाही आक्रमकपणे उतरली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनीही रस्त्यावर उतरून शिवसैनिकांसह लांजा आणि राजापूरमधील सुरु असलेल्या बाजारपेठा आज सकाळी बंद केल्या.
पाच दिवसांपासून शेतकर्यांची राज्यातील विविध भागात आंदोलने सुरु आहेत. सरकारमध्ये सहभागी असणारी शिवसेना संपात उतरल्याने सरकारची नाचक्की झाली आहे.
शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर शिवसेनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
साळवी यांनीही आंदोलनात शिवसैनिकांसह आजच्या संपात सक्रिय सहभाग घेतला.