रत्नागिरी (आरकेजी)- शिरळ सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील कोंढे व पाचाड गावातील यशस्वी आयोजनानंतर वैजी गावामध्ये दत्त मंदिरात शेतकरी संपर्क अभियान नुकतेच संपन्न झाले.
प्रारंभी वैजी गावाच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे यांनी गावात संपर्क अभियान आयोजित केले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सचिव व गावातील पदाधिकाऱ्यांचा पालक संचालक रवींद्र मोहिते व संचालिका विजया मोरे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सोसायटी सचिव संजय खेतले यांनी आपल्या प्रास्ताविकात सोसायटीच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकरी व संचालक मंडळाची विविध विषयांवर चर्चा झाली. सोसायटी चेअरमन सुनिल उर्फ नाना टेरवकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आलेख शेतकऱ्यांसमोर सादर करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सोसायटीच्या धर्मादाय निधीतून वैजी येथील श्री सुकाई देवीच्या मंदिरासाठी देणगी म्हणून रक्कम रुपये पाच हजाराचा धनादेश यावेळी विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. दिलिप देसाई, तुकाराम बामणे, अनंत ठसाळे, विजय वाजे, अनिलशेठ चिले, भाई करंजकर, दिलिप कुळे, विनायक भुवड, राजेंद्र पवार, श्रद्धा घोले, रमेश ठसाळे, आत्माराम खेतले व कुमार प्रफुल्ल साबळे यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, अभियानास सुकाई चंडकाई देवस्थानचे मुख्य विश्वस्त के एस मोरे, रामचंद्र मोरे, वासुदेव गोरीवले, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन निकम, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोरे, माजी सरपंच यशवंत गोरीवले, माजी सैनिक शांताराम मोरे, बळीराम मोरे, महेंद्र जाधव, दत्ताराम मोहिते, निळकंठ मोरे, तुळशीराम मोरे, गोपाळ मोरे, अनंत मोरे, विजय पवार, संतोष कांबळे, शंकर मोहिते व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.