रत्नागिरी (आरकेजी): संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्र विविध घोटाळ्यांमुळे बदनाम होत असताना चांगल्या विचारांची, पारदर्शक कारभाराची माणसं संचालक मंडळात राजकारण विरहीत काम करतात. त्यामुळेच शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सोसायटीने प्रगती साधली आहे आणि ही संस्था सदैव उंच शिखरावर राहील, असे गौरवोद्गार माजी कामगार मंत्री व विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी तालुक्यातील रेहेळ-भागाडी येथे काढले.
शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या “दिनदर्शिका २०१८” चे प्रकाशन भास्करराव जाधव यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. रेहेळ-भागाडी बस थांबा ते शिरळ सोसायटी कार्यालयपर्यंतच्या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. सोसायटीच्या संचालक मंडळाने आमदारसाहेबांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावर तात्काळ कार्यवाही करून एक महिन्याच्या आत ठेकेदार अनिलशेठ चिले यांनी उच्च दर्जाचे नुतनीकरण केले.नुतनीकरणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीकडे वळावे असे आवाहन केले. भविष्यात सोसायटीच्या हितासाठी मला कोणतेही काम सांगा, मी सदैव कटीबद्ध आहे असे अभिवचन दिले.
शिरळ सोसायटीचे चेअरमन सुनिल उर्फ नाना टेरवकर यांनी शाल, श्रीफळ, बुके व शारदादेवीची मुर्ती साहेबांना भेट देऊन कृतज्ञतापुर्वक सत्कार केला. आपल्या भाषणात आमदारसाहेबांनी आजपर्यंत कोंकण किंबहुना महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून सोडवले त्याचा उल्लेख केला.साहेबांना खास सहकारी शुभेच्छा देताना भविष्यात केवळ आमदार न राहता पुन्हा नामदार व्हावे व सहकार मंत्री बनावे असे परमेश्वराकडे साकडे घातले. दिनदर्शिकेच्या सर्व जाहिरातदारांचे आभार व्यक्त केले. सर्व सभासदांना दिनदर्शिका मोफत देण्यात आली. सुबक दिनदर्शिकेची छपाई करणारे विकास उदेग यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा सहकार बोर्डाचे शिक्षणाधिकारी डी डी सोनाळेकर यांनी अत्यन्त उपयुक्त सहकार प्रशिक्षण दिले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेश वाजे यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक व आमदारसाहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र समीरदादा जाधव, कळवंडे सोसायटीचे चेअरमन नारायण उदेग, निर्व्हाळ सोसायटीचे चेअरमन मोहन सावंत, कोंढे सरपंच शशिकांत साळवी, उपसरपंच नसरीन किल्लेकर, माजी पोलीस पाटील भाई नलावडे, शिरळ उपसरपंच अब्बास म्हातारनाईक, रेहेळ भागाडी वैजीचे उपसरपंच गजानन वाघे, रुपेश खताते, माजी सल्लागार प्रदिप शिर्के खोपड, सुकाई चंडकाई देवस्थान शिरळ –वैजी –मालघरचे मुख्य विश्वस्त के एस मोरे, माजी व्हाईस चेअरमन वासुदेव गोरीवले, मालघरचे माजी सरपंच नरेश झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस चेअरमन दिलिप देसाई, ज्येष्ठ संचालक तुकाराम बामणे, अनंत ठसाळे, विजय वाजे, अनिलशेठ चिले, रविंद्र मोहिते, विनायक भुवड, राजेंद्र पवार, संचालिका विजया मोरे व श्रद्धा घोले, तज्ञ संचालक रमेश ठसाळे, आत्माराम खेतले, सचिव संजय खेतले व लिपिक प्रफुल्ल साबळे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन दिलिप कुळे यांनी केले तर आभार भाई करंजकर यांनी मानले.