शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्यासाठी आपले जिकरीचे प्रयत्न – रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब माने
रत्नागिरी, प्रतिनिधी
सध्या खतांचा तुटवडा असून, राज्य सरकारने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्यासाठी आपले जिकरीचे प्रयत्न सुरू असल्याचं रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब माने यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बाळासाहेब माने की, जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन लाख मेट्रिक टन भाताचं उत्पादन होतं, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. तसेच जिल्ह्यात जवळपास 70 ते 75 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे, सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड आहे. तसेच नारळ, सुपारीची लागवडही जिल्ह्यात चागल्या प्रकारे झालेली आहे. या सर्वांना लागणारी ही रासायनिक आणि सेंद्रिय खते आहेत ती उपलब्ध करून देणं काम सरकारचं आहे,
60 ते 70 हजार मेट्रिक टन युरिया किंवा नत्र खतं लागतात आणि तेवढीच मिश्र खतं लागतात.
मात्र सध्या खतांचा तुटवडा आहे, शासनाने याकडे लक्ष
देणं आवश्यक आहे. याबाबत रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने सरकारला आपण पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर खतं मिळाली पाहिजेत यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना आपण पत्राद्वारे केला असल्याचं माने यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्यासाठी आपले जिकरीचे प्रयत्न सुरू असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं.