रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात आज काढण्यात आली. जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण नऊ पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एका विद्यार्थीनीच्या हस्ते आरक्षणांची चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राजापूर ओबीसी सर्वसाधारण, रत्नागिरी ओबीसी महिला, संगमेश्वर, चिपळूण, खेड आणि गुहागर सर्वसाधारण महिला तर मंडणगड, दापोली आणि लांजामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी त्यांची घोषणा केली.