रत्नागिरी (आरकेजी): सध्या देशात मुली किंवा महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्या सुरक्षित नाही त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. पण एखाद्या मुलीवर अत्याचार किंवा बलात्कार झाला कि, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उभं रहातं. पण याला काही पोलिस अपवाद असतात. असाच अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा बलात्काराचा तपास पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेमुळे उघड झाला आहे. देवरुखमधील जन्मापासून गतिमंद असणाऱ्या तरुणीला, तिच्या गतिमंदाचा फायदा घेवून तिच्यावर बलात्कार करून मातृत्व लादले. मात्र आपल्यावर बलात्कार करणारी व्यक्ती कोण हेही सांगू न शकणाऱ्या हि तरुणी, अशा विचित्र परिस्थितीतून मार्ग काढत देवरूख पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख पोलिस स्टेशनच्या हद्दीतील निवे बुद्रुक गावं. पण याच गावातील एक ३२ वर्षीय तरुणी. पण हि तरुणी जन्मापासून गतिमंद आहे. तिची आई सुद्धा गतिमंद. पण याच गतिमंदतेचा फायदा उठवला गेला. आणि घरातून तिच्या नातेवाईकांची नजर चुकवून बाहेर पडलेल्या या ३२ वर्षीय तरुणीला याची शिक्षा भोगावी लागली. तिच्या या मानसिक रुग्ण असलेल्याचा फायदा उठवला गेला. तिला जेवणाचे आमिष दाखवून संगमेश्वर गावातील एका २३ वर्षीय तरुणाने तिचा फायदा उचलला. घरातून बाहेर पडलेल्या या गतिमंद तरुणीवर या २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. आपली शारिरिक हाव भागल्यावर त्याने या तरुणीला चक्क संगमेश्वर एसटी स्टॅण्डवर सोडून दिले. सात महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हि मानसिक रुग्ण असलेली तरुणी तिच्या नातेवाईकांना भेटली. मात्र त्यावेळी या तरुणीची अवस्था फार बिकट होती. २९ जून २०१७ साली या तरुणीने एका मुलाला जिल्हा रुग्णालायत जन्म दिला. त्यावेळी या प्रकरणी देवरूख पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केली. आणि देवरूख पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली.
बालात्काराच्या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न झाला नाही, कि त्या केस तशाच पडून रहातात. पण देवरूख पोलिसांनी अत्यंत चाणाक्ष्य नजरेतून तपास केला. घरातून बाहेर पडल्यानंतर हि तरुणी कुठे गेली, कुठे राहिली त्याचे बारिक तपशील जमा केले. त्यानंतर या तरुणीला जेवणाची फुस लावून संदिप वाघमारे या तरुणाने त्याच्या घरी नेले. त्यानंतर जवळपास आठ दिवस या तरुणीला तिने एका खोपट्यात ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संदिप विरोधात पोलिसांचा संशय बळावला. आणि देवरूख पोलिसांनी आपली पुर्ण शक्ती पणाला लावली आणि या आरोपीचा शोध घेतला.
संदिपने तिच्या मानसिक रुग्ण असलेला फायदा उठवला आणि माणुस्कीला काळीमा फासणारी घटना केली. या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवर अत्याचार केले. मात्र प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना देवरूख पोलिसांनी केवळ हि तरुणी या तरुणाकडे दिसल्याच्या संशयावरून सारी सुत्रे हलवली. तपासाच्या खाचा खोचा सांभाळत त्याच्या विरोधातील पुरावे देखिल गाोळा करण्यात देवरूख पोलिस यशस्वी झाले. त्यामुळे तब्बल एका वर्षांनी या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवरच्या बलात्कारातील आरोपीला देवरूख पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
संदिप वाघमारे या २३ वर्षीय तरुणाला देवरूख पोलिसांनी अटक केली आहे. त्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची कबुली या आरोपीने पोलिसांना दिली आहे. मानसिक रुग्ण आणि त्यात एक मुलगा अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या या तरुणीची डीएनए चाचणी पोलिसांनी केली आहे. मात्र या नराधम आरोपी विरोधात आता गुन्हा सिद्ध करण्यासाठी या आरोपीची डीएनए चाचणीसाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.
सध्या अटक केलेल्या या नराधमाला सोमवारपर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे. पण माणुसकिला काळीमा फासणाऱ्या या नराधमाच्या तब्बल एका वर्षानंतर मुसक्या आवळल्या गेल्यात. बलात्कार आणि त्या संदर्भातील घटना वाढत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक वेळा पोलिसांवर बोट दाखवतो. मात्र पोलिसांनी अवघड आणि क्लिष्ट गुन्हा उघड करून पोलिस काय करु शकतात हे दाखवून दिलं आहे.