रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी बुधवारी पूर्ण झाली आहे. १२ मार्चपासून सुरू झालेल्या मैदानी चाचणी प्रक्रियेत एकूण १७ हजार ७६६ उमेदवार पात्र, तर १ हजार ५८८ उमेदवार अपात्र ठरले. मैदानी चाचणीत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, याबाबतचा तपशिल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या१९४ रिक्तपदांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी १२ मार्चपासून पोलीस मुख्यालयाच्य कवायत मैदानावर सुरू करण्यात आली होती़ मैदानी चाचणीसाठी तब्बल २८ हजार २८६ उमेदवारांना बोलावण्यात आले होते़ त्यापैकी १९ हजार ३५४ उमेदवारी मैदानी चाचणीसाठी हजर राहिले़ त्यामध्ये १७ हजार ७६६ उमेदवार पात्र ठरले असून, १ हजार ५८८ उमेदवार अपात्र ठरले आहेत. पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे. यानंतर घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेबाबतची तारीख, वेळ आणि ठिकाण इत्यादी माहिती पात्र उमेदवारांना संकेतस्थळावर तसेच प्रसारमाध्यमांच्याद्वारे जाहीर करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.