
आयुब खान, पोलिस निरिक्षक. वाहतूक विभाग
रत्नागिरी (आरकेजी)- सरत्या वर्षात नियमांचे उल्लघंन करुन वाहने चालविणाऱ्या ४१ हजार ३४७ चालकांची रत्नागिरी पोलिसांनी ‘कॉलर’ पडकली. यापैकी १७३ धुमस्टाईल वाहन चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. पाेलिसांनी तसा प्रस्ताव तयार केल्याने वाहन चालकांची धावपळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सरत्या वर्षात म्हणजेच २०१७ मध्ये जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने आदल्या वर्षी पेक्षा जवळपास दुप्पट दंड नियम तोडणाऱ्यांकडून वसूल केला आहे. वाहतूक शाखेने २०१७ मध्ये ४१ हजार ३४७ जणांवर विविध प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणांतील तडजोड शुल्क म्हणून १ कोटी ७ लाख ७२ हजार ७५९ रुपयांचा दंड गोळा करण्यात आला. २०१६ मध्ये एकूण ३४ हजार ६०२ जणांवर कारवाई करुन ५२ लाख रुपये दंड वसूल केला होता. मात्र यंदा जवळपास ५६ लाख रुपयांनी अधिक हा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आयुब खान यांनी दिली.
२०१७ मध्ये गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५५३ जणांवर कारवाई, नॉन साईड ड्रायव्हिंग ८५३६, विदाऊट हेल्मेट ३१०८, सिल्ट बेल्ट ३०१, ड्रंक अँड ड्राईव्ह ७८, तर धूम स्टाइल १७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान नो पार्किंगच्या ५२८९ प्रकरणात १० लाख ६६ हजार ८०० रुपये जमा झाले. त्यापैकी १७३ धुमस्टाईल स्वारांचे चालक परवाना रद्दचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठवला असल्याचंही खान यांनी यावेळी सांगितले.















