रत्नागिरी (आरकेजी): राज्यात शंभर टक्के प्लास्टिक बंदी केली जाणार आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर याची अंमलबजावणी केली जाईल. मात्र त्यानंतर ही दुकानदारांकडे प्लास्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. खेडमधील पत्रकारांशी ते बोलत होते.
सध्या प्लास्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्यात प्लास्टीक बंदी राज्यात केली जाणार आहे. शंभर टक्के प्लास्टीक बंदी राज्यात केली जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच हि माहिती दिली आहे. प्लास्टीक ऐवजी कापडी पिशव्या, काचेच्या बाटल्या याच्या वापरावर भर दिला जाणार आहे. प्लास्टीक बंदिची अंमलबजावणी गुढीपाडव्यानंतर करण्यात येणार आहे. यानंतर मात्र दुकानदारांकडे प्लास्टीक पिशवी आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरीही त्यांनी प्लास्टीक पिशव्या बाळगल्या तर त्याचा परवाना देखील रद्द करण्यात यईल, असे पर्यावरण मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय कदम बालिश – कदम
रामदास कदम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करू, असं जाहीर आव्हान दापोली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी दिलं होत. यावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम संजय कदम यांना प्रत्युत्तर देताना ते बालिश असल्याचा घणाघात चढवला. तसेच रामदास कदम यांच्या पराभव करण दुरच राहीलं, आधी माझ्या मुलासमोर उभं राहून निवडणूक लढवून दाखव, असं थेट आव्हान दिले. ग्रामपंचायत निवडणुकीत ४० पैकी ३३ ग्रामपंचायतीवर मुलगा योगेश ने निवडून आणल्या. त्यावेळी संजय कदम झोपले होते का? ज्याला ग्रामपंचायती आणता अाल्या नाहीत, तो विधानसभेची निवडणूक काय जिंकणार असा जोरदार शाब्दिक प्रहार रामदास कदम यांनी संजय कदम यांच्यावर केला आहे.