
रत्नागिरी, (आरकेजी) : कोकणात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. २४ तासात ८६ मिमि पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे. खेड तालुक्यात २४ तासात १४९ मिमि एव्हढा पाऊस झाला. उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरलेला नाही. सकाळपासून गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. दमदार पाऊस होत असल्यानं शेतीच्या कामांना कोकणात वेग आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांत झालेली नोंद (मिंलीमिटर मध्ये)
चिपळूण – १३६
दापोल – ११३
मंडणगड – ९१
गुहागर – ६८
राजापूर – ६२
जूनपासून आतापर्यत ५९९ मिलिमिटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
जूनपासून आतापर्यत ५९९ मिलिमिटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
झाडे पडल्याने लांजा-माजळ मार्ग तब्बल पाच तास ठप्प
लांजा तालुक्यातही वादळी वार्यासह कोसळलेल्या पावसामुळे लांजा-माजळ मार्गावर आकाशी ही जंगली झाडे कोसळली. त्यामुळे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांनी झाडे बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, माजळ, जावडे, कोंड्ये आणि रावरी या गावांचा संपर्क तुटला होता. झाडे पडून मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.