रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवड गुरूवारी बिनविरोध पार पडली. पाली पंचायत समिती गणातून पतिनिधीत्व करणारे सदस्य उत्तम सावंत यांची यापदी बिनविरोध निवड झाली आहे.
उपसभापती असलेल्या दत्तात्रय मयेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी आता पाली पं.स.गणातील सदस्य उत्तम सावंत यांच्या नावावर अगोदरच शिक्कामोर्तब झालेले होते. गुरूवारी जि.प.येथील लोकनेते शामराव पेजे सभागृहात उपसभापतीपदासाठी ही निवड पकिया पार पडली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार शशिकांत जाधव यांनी काम पाहिले. त्यावेळी गटविकास अधिकारी तुकाराम जाधव हे देखील पमुख उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत उपसभापती पदासाठी एकमेव उत्तम सावंत यांचा अर्ज दाखल झाला. त्यामुळे दुपारी सावंत यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी सावंत यांचे अभिनंदन करण्यासाठी सभापती सौ. संजना माने, माजी सभापती उत्तम मोरे, ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील, सदस्य सुनील नावले, माजी सभापती सौ. पाजक्ता पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय उर्प बाबू मयेकर, भैय्या भोंगले, शंकर सोनवडकर, विभांजली पाटील, सुजाता पाष्टे, सदस्या सौ. साक्षी रावणंग, आदींची उपस्थिती होती.