रत्नागिरी दि. 20 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जानेवारी 2022 पासून मच्छिमार तरुणांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या 118 व्या सत्राची सुरुवात रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. तरी खाली नमूद केल्याप्रमाणे अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी स्वत:च्या हस्ताक्षरातील मच्छिमारी सहकारी संस्थेच्या शिफारशीसह आपले अर्ज 31 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी रत्नाकर प्रभाकर राजम, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, पेठकिल्ला रत्नागिरी पिन कोड 415612 ई-मेल ftcrtn@gmail.com व्हॉटसप क्रमांक 9421264438/9921330300 या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षाचे आत असावे. उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक). क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा (विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेच्या अर्जाची शिफारस घ्यावी) प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह 450 रुपये प्रमाणे सहा महिन्याचे 2 हजार 700 रुपये तसेच दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांना प्रतिमाह 100 रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे 600 रुपये आहे. दारिद्र्य रेषेखालील उमेदवारांनी ग्रामसेवक/गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा. सदर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत योजनेतून अर्थसहाय घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकते.