रत्नागिरी : रत्नागिरीच्या कारागृहातून एका कैद्यानं पलायन केल्याची घटना घडली आहे. रुपेश तुकाराम कुंभार असं पलायन केलेल्या कैद्याचं नाव असून तो एका खुनाच्या गुन्ह्यातील कैदी आहे. याबाबतची तक्रार आज रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रुपेश कुंभार हा ओपन जेलमधील कैदी होता. शासनाने ओपन जेल संकल्पनेतून ज्यांची वागणूक चांगली आहे त्यांना जेल आणि परिसरात फिरण्याची आणि काम करण्याची मुभा दिली होती. त्यासाठी रुपेश याला रत्नागिरीच्या जेल येथे आणण्यात आलं होतं. मात्र रुपेश हा जेल बाहेरील परीसरात काम करत असताना लघवीला जातो असं सांगून गेला आणि तो परत आला नाहीच. अखेर रुपेश याने पलायन केलं अस सिद्ध झाल्यावर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे