रत्नागिरी, ६ मे : रत्नागिरी जिल्हयातील खांदाटपाली, पूर, तळेघर, बामणोली ही गावे कोरोना बाधित क्षेत्र घोषित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. शासनाने कोरोना विषाणूचा(COVID-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली गावातील 1 व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झालेला आहे. संगमेश्वर तालुक्यातील पूर गावातील 1 व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झालेला आहे. मंडणगड तालुक्यातील तळेघर गावातील 1 व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झालेला आहे. संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावातील 1 व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झालेला आहे.
त्यामुळे सदर रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या परिसरातील भाग Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोरोंनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या गावांतील हद्दीमधील आजूबाजूचा परिसर, यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदर क्षेत्र Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून जाहीर केला आहे. कोरोना विषाणू बाधीत क्षेत्राच्या सीमा सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे राहतील. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर बाधीत क्षेत्रात प्रवेश करण्यास लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी या आदेशान्वये प्रतिबंध केले आहे.
सदर आदेश अत्यावश्यक सेवा उदा. सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. वितरीत करणारे/सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत.
तरी अशा प्रकारचा प्रतिबंध लागू असल्याबाबत मंडणगड तालुक्यातील तळेघर व त्याच्या आजूबाजूचा परिसर व कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आजूबाजूच्या परिसरात येणारी सर्व गावे/ वाडया या मधील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून तसेच दवंडी देऊन संबंधित तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी प्रसिद्धी द्यावी.
विस्थापित मजूर, पर्यटक, विद्याथी, यात्रेकरु व इतर व्यक्ती यांना स्थलांतरणास परवानगी दिली असली तरी Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) मधून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल येईल, असे आदेशात नमूद केलेले आहे.